महाराष्ट्र: १३ एप्रिल रात्री ८:३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली राज्यात संपूर्ण लॉकडाऊन ची घोषणा, १५ एप्रिल रात्री ८ वाजेपासून हा लॉकडाऊन सुरू होणार आहे व पुढील १५ दिवस हा लॉकडाऊन राहणार असेही त्यांनी स्पष्ट केले.
लॉकडाऊन बद्दल मुख्य माहिती व नियम
१.लॉकडाऊन उद्या रात्री म्हणजे १५ एप्रिल पासून लागू होणार आहे.
२.अनावश्यक कारणास्तव बाहेर फिरता येणार नाही.
३.सार्वजनिक वाहतूक सेवा चालू राहणार आहे.
४.अत्यावश्यक सेवा चालू राहणार आहेत.
५.मेडिकल दवाखाने व किराणा मालाची दुकाने चालू राहणार आहेत.
६.रेल्वे, लोकल व बससेवा चालू राहणार.
७.खत दुकाने,व शेती च्या मालाची दुकाने चालू राहतील.
८.औद्योगिक क्षेत्रातील उद्योग धंदे चालू राहतील.
९.हॉटेल , रेस्टॉरंट व बार बंदच राहतील फक्त डिलिव्हरी ची मुभा.
१०.पेट्रोल पंप चालू राहतील.
११.अत्यावश्यक सेवेशी निगडित उद्योग चालू राहतील.
१२.एका महिन्यासाठी 3 किलो धान्य मोफत मिळणार आहे.
राज्य सरकारने केलेल्या पैसे वाटपाच्या घोषणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात लॉकडाऊन मुळे होणाऱ्या नुकसान भरपाई म्हणून अनेक कर्मचाऱ्यांना आर्थिक मदद करण्याची घोषणा केली आहे ह्या घोषणा खालील प्रमाणे आहेत:
१.अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना एक महिन्यासाठी प्रत्येकी 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहेत, ह्या योजने मध्ये सात कोटी लोकांचा समावेश आहे.
२.महाराष्ट्र राज्य इमारत कामगार कल्याण मंडळातील 12 लाख लाभार्थ्यांना प्रत्येकी 1500 रुपयांची आर्थिक मदद लागू होणार आहे.
३.नोंदणीकृत घरेलू कामगार यांना देखील आर्थिक मदत देण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हटले आहेत.
४.इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ वेतन योजना, इंदिरा गांधी विधवा निवृत्ती योजना, श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना अशा पाच योजनेतील लाभार्थ्यांना 1 हजार रुपये आगाऊ देण्याचे आश्वासन आहे व यामध्ये 35 लाख लोकांचा समावेश आहे.
५.अधिकृत फेरीवाल्यांना प्रत्येकी 1500 रुपयांची आर्थिक मदद जाहीर झाली आहे.
६.राज्यातील कमीत कमी १५ लाख रिक्षाचालकांना 1500 रुपयांची आर्थिक मदद देण्यात येणार आहे.
७.आदिवासी समाजातील खावटी योजनेच्या लाभार्थी आदिवासी कुटुंबाना प्रत्येकी 2000 रुपये देत आहोत. त्यांची संख्या 12 लाख आहे.
८.कोविड संदर्भातील उभारणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना 3300 कोटींचा निधी राखीव ठेवला आहे.
९.वरील सर्व योजनेसाठी राज्याला लागणारे 5 हजार 400 कोटी राज्य सरकारने काढून ठेवले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी मोदींना केलेल्या मागण्या
इतर राज्यातून ऑक्सिजन आणण्यासाठी लष्कराची मदद व वायू दलाच्या मदतीने हवाई मार्गाने ऑक्सिजन आणण्यासाठी परवानगी द्यावी आणि त्याची व्यवस्था करावी अशी मागणी आहे.
मार्चमध्ये जीएसटीची मर्यादा असते ती आणखी 3 महिन्यांनी वाढवण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार ह्याने लहान उद्योग धंद्याला जरा मदत होईल.
या काळात रोजीरोटी गेली त्यांना व्यक्तिगत मदत करण्यासाठी पंतप्रधान मोदींकडे मागणी करणार.
हे लेख वाचा :
मंगळदोष घालवण्यासाठी शिक्षिकेने केलें विद्यार्थ्यां सोबत लग्न !
अस्सल भारतीय वाटणाऱ्या ह्या कंपन्या चायनीज आहेत ? Boycott Indian China
दाढ दुखीवर सोपा घरगुती उपाय – Simple Home Remedy for Toothache