2 एप्रिल पासून लॉकडाऊन ? महाराष्ट्र लॉकडाऊन ?

कोरोनाच्या वाढत्या केसेस व कोरोनामुळे झालेली महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता लॉकडाऊन हा एकच पर्याय आहे का व 2 एप्रिल पासून लॉकडाऊन होईल का ह्यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज खुलासा केला आहे.

आत्ताच दिलेल्या मुलाखातीत महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे सांगतात की 50 % लॉकडाऊन 2 एप्रिल पासून होणार नाही मात्र ह्यावर नक्कीच 1 ते 2 दिवसात मीटिंग होईल व 50 % लॉकडाऊनचा निर्णय देखील होऊ शकतो. 2 एप्रिल पासून कुठलाही लॉकडाऊन नाही आहे मात्र सध्या लागू असलेले निर्बन्ध नक्कीच अजून कडक होतील हा निर्णय झाला आहे.

मुंबईत लॉकडाऊन वर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे काय बोलले

मुंबईत झटपट लॉकडाऊन लावला जाणार नाही मात्र तूर्त निर्बन्ध कडक केले जातील, मुंबईत टेस्टिंग, लसीकरण व बेड ची उपलब्धता यावर भर दिला आहे त्यामुळे झटपट लॉकडाऊन लावला जाणार नाही, व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच ह्यावर योग्य तो निर्णय घेतील अशे टोपे बोलत होते.
त्यामुळे मुंबईत किंवा महाराष्ट्रात 2 एप्रिल पासून कुठलाही लॉकडाऊन लावला जाणार नाही हे स्पष्ट झाले आहे व अशा लॉकडाऊन च्या अफवावर विश्वास ठेवू नका.


लेख महितीशीर वाटल्यास फॉरवर्ड करा 

Leave a Reply