- दक्षिणी कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या अभ्यासानुसार हे निर्धारित करण्यात आले आहे की कोविड -१९ ची लक्षणे बहुतेक वेळा एका विशिष्ट क्रमाने दिसून येतात.
- इन्फ्लूएन्झा व कोरोना ह्या दोन्ही रोगांची लक्षणे सारखी असल्याने उपचारा मध्ये गडबड होऊ शकते मात्र अभ्यासानुसार, असे सांगण्यात आले आहे की इन्फ्लूएन्झा सहसा खोकल्यापासून सुरू होतो, तर कोविड -१९ चे पहिले लक्षण ताप आहे.
कोरोनाची प्रमुख लक्षणे ताप आणि खोकला आहेत जे इतर रोगांच्या लक्षणांप्रमाणेच असतात जसे की सध्याच्या वातावरणात बदल झाल्यामुळे तापाची सुद्धा सात चालू आहे।
तापाची सात असल्याने तुम्ही हे नक्की कशे ठरवू शकता की हा ताप सातीमुळे आलाय की कोरोनामुळे ? एका नवीन अभ्यासानुसार कोरोनाची लक्षणे कशी अस्तित्त्वात आहेत यावर प्रकाश टाकला आहे, ज्या मूळे हा ताप कोरोनाचा आहे की सातीचा हे कळू शकते.
युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया (यूएससी) च्या संशोधनात हे निश्चित करण्यात आले आहे की कोरोनाची लक्षणे बहुतेक वेळा एका विशिष्ट क्रमाने सुरू होतात.
या शोधामुळे कोरोना मधील लोकांना स्व-पृथक्करण(Self Quarantine) आणि लवकर उपचार मिळविण्यात मदत होईल ज्यामुळे रुग्णांच्या उपचारामध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकेल.
संशोधनासाठी वैज्ञानिकांनी चिनी डेटा वापरला
लक्षणांच्या क्रमाचा अंदाज लावण्यासाठी, संशोधकांनी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) एकत्रित केलेल्या लक्षणांच्या घटनांचे प्रमाण चीनमधील 55,000 पेक्षा जास्त कोरोना रुगणाचे रिपोर्ट घेतले.
इन्फ्लूएन्झाशी कोरोना च्या लक्षणांच्या क्रमांची तुलना करण्यासाठी, संशोधकांनी उत्तर अमेरिका, युरोप आणि दक्षिण गोलार्धातील 1994 आणि 1998 दरम्यान झालेल्या इन्फ्लूएन्झाचा डेटा व कोरोनाच्या चिनी डेटा यांची तुलना करून निकष लावला.
कोविड -१९ च्या लक्षणांची क्रमानिका खलील प्रमाणे असते:
अभ्यासाच्या निष्कर्षांनुसार, कोविड -१९ च्या रुग्णांमध्ये अनुभवू शकणार्या लक्षणांची ही क्रमवारी आहे:
- ताप
- खोकला व अंगदुखी
- उलटी व मळमळणे
- जुलाब
अभ्यासानुसार, असे सांगण्यात येते की इन्फ्लूएन्झा चे पहिले लक्षण हे खोकला आहे तर कोरोनाचे पहिले लक्षण ताप आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी ताप हे प्रमुख लक्षण मानून टेस्टिंग केली पाहिजे व कोरोना आहे की नाही हे सुद्धा कन्फर्म करून उपचार केल्याने कोरोनवर यशस्वी रित्या मात करता येईल असे ह्या अभ्यासामध्ये सांगितले आहे.