बेळगावात वाघ सिंहाचा खेळ चालू आहे इथे माकडांचे काम नाही – संजय राऊतांचा भाजपला टोळा

  0
  410
  sanjay raut
  sanjay raut

  बेळगाव: महाराष्ट्र एकीकरण समिती उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते संजय राऊत यांनी काल सभा घेतली, ह्या सभेमध्ये भाजपला चांगलेच खडेबोल राऊतानी सुनावले आहेत। या शिवाय छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा रात्रीत हटवल्या मूळे कर्नाटक सरकार चा देखील चांगलाच समाचार राऊतानी घेतला।

  बेळगांवमधील संयुक्त महाराष्ट्र चौकात ही सभा झाली, या सभेला शिवसेना खासदार धैर्यशील माने देखील उपस्थित होते। तुम्ही लोकशाही मानत असाल तर बेळगावात येऊन पहा असे आवाहन संजय राऊतानी भाजप नेत्यांना केले आहे।


   सध्या भाजपचे प्रमुख नेते म्हणजे पंतप्रधान मोदी व अमित शाह हे बंगालच्या दौऱ्यावर आहेत व तिथे ममता दीदी त्यांच्यावर कशे अत्याचार करत आहे हे सांगत आहेत। मात्र खरा अत्याचार बेळगावच्या जनतेवर होत आहे तो येऊन बघा असे राऊत बोलले।

  चळवळीला सर्वात जास्त सुरूंग हा भारतीय जनता पार्टीने लावला आहे. नितीन गडकरी बेळगांवमध्ये येणार आहेत. एका मराठी माणसाचा पराभव करण्यासाठी ते येतात हे चूक असल्याचे राऊत म्हणाले. हे चुकीचे आहे ते सगळ्यानी त्यांना सांगा असे ते म्हणाले.


  बेळगावमध्ये खूप वर्षांनी वाघ आणि सिंहाचा खेळ सुरू झालाय. त्यामुळे माकडांच अवघड झालं आहे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा संपलेलं नाही. बाबासाहेब आंबेडकर यांनी अधिकार स्वातंत्र्य दिलंय. शुभमच्या नावाने हा लढा पुन्हा एकदा सुरू झाला आहे. आत्ता रक्त सांडणार, लाठ्या काठ्या खाणार नाही..पण आता झेंड्याच्या काठ्या हातात घेवू असे राऊत म्हणाले.

  Advertisement
  राज्यात संपूर्ण लॉकडाऊन वाचा काय राहील चालू व कोणाला किती मदत मिळणार ?
  महाराष्ट्र: १३ एप्रिल रात्री ८:३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली राज्यात संपूर्ण लॉकडाऊन …
  महत्वपूर्ण बातमी : कोरोनाची लक्षणे सहसा या क्रमाने दिसली जातात !
  कोरोनाची प्रमुख लक्षणे ताप आणि खोकला आहेत जे इतर रोगांच्या लक्षणांप्रमाणेच असतात जसे …
  2 एप्रिल पासून लॉकडाऊन ? महाराष्ट्र लॉकडाऊन ?
  कोरोनाच्या वाढत्या केसेस व कोरोनामुळे झालेली महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता लॉकडाऊन हा एकच पर्याय …
  लेटरबॉम्ब बद्दल मुख्यमंत्र्यांनी बोलले पाहिजे मात्र मोदींची शेतकरी आंदोलनावर चूप्पी चालते ? फडणवीसांना सवाल !
  सत्ता गेल्यापासून महाराष्ट्रातील भाजप चलबिथल झाल्याचे दिसत आहे, दर महिन्याला पुढच्या तीन महिन्यात …
  विरोधक हातामध्ये भिजलेले फटाके घेऊन फिरत आहेत,ते वाजणार नाहीत: संजय राऊत
  संजय राऊत (sanjay raut) यांनी नुकतीच घेतलेल्या पत्रकार परिषदेत असे म्हटले आहेत की …

  Leave a Reply