मोठी बातमी: कोरोनाची नवी नियमावली लागू सोबतच कडक निर्बंध लागू

  0
  548

  मुंबई: राज्यातील कोरोनाची परिस्थिती अधिक विस्कळीत होत असून नागरिक लॉकडाऊनच्या नियमावलीचा धुरळा उडवत आहेत, ह्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने कोरोनाची नवी नियमावली लागू केली आहे व सोबतच कडक निर्बंध लागू केले आहेत।

  काय आहेत नवीन नियम ?

  • किराणा माल दुकाने सकाळी ४ तास उघडी राहतील, सकाळी ७ ते ११ ह्या वेळेत किराणा मालाची.
  • भाजीपाळा मार्केट व दुकाने सुद्धा सकाळी ४ तास उघडी राहतील, सकाळी ७ ते ११ ह्या वेळेत ही दुकाने उघडी राहतील.
  • या सोबतच फळे, डेअरी, बेकरी ही दुकाने देखील सकाळी ७ ते ११ पर्यंत उघडी राहतील.
  • होम डिलिव्हरी सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंतच मिळणार आहे.
  • कृषी संबंधित दुकाने देखील ४ तास चालू ठेवण्याची मुभा राज्य सरकार ने दिली आहे, ही दुकाने सकाळी ७ ते ८ च्या दरम्यान चालू राहतील.

  इतर कोणते निर्बंध लागू शकतात ?

  पोलीस प्रशासन अधिक सक्रिय होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे, कारण जसे गेल्यावर्षीच्या लॉकडाऊन मध्ये कडक नाकाबंदी होती व पोलीस सर्व रस्ते रोखून होते यामुळेच मागचा लॉकडाऊन बऱ्यापैकी यशस्वी ठरला. त्यामुळे सध्या सुद्धा अशाच लॉकडाऊन चा पर्याय सुद्धा राज्य सरकार लावू शकत आहे व तसेच पोलीस प्रशासन अधिक सक्रिय करण्याची चर्चा देखील चालू आहे.

  जिल्हाबंदी व सार्वजनिक वाहतूक बंदी यावर सध्या अद्यापही चित्र स्पष्ट झालेले नसून , जर अतिशय कठोर नियमांचा लॉकडाऊन लावायचा निर्णय झाला तर अशे निर्णय घेण्याची शक्यता आहे.

  मंत्र्यांचा कडक लॉकडाऊन चा सूर !

  सध्या राज्य सरकार मधील सर्व मंत्र्यांचा एकच सूर आहे की सध्याचे निर्बंध अतिशय शिथिल असून त्यांचा काहीच उपयोग होत नाही आहे व त्यामुळे आरोग्य सेवेवर ताण पडत आहे म्हणूनच कडक लॉकडाऊन हेच उत्तम पर्याय आहे. छगन भुजबळ, राजेश टोपे, विजय वादडेट्टीवार या सर्व नेत्यांनी कडक लॉकडाऊन ची मागणी केली आहे.

  जनतेला आवाहन

  सध्याची परिस्थिती खूपच बिकट आहे रुग्णांना बेड नाहीत, ऑक्सिजन नाही, रेमेडिसविर भेटत नाही आहे, आशा वेळी स्वताची काळजी घ्या आणि कोरोना पासून वाचा असे आवाहन आम्ही आपणास करत आहोत. विनाकारण बाहेर पडू नका व सरकारला मदद करा.

  Advertisement

  जय हिंद, जय महाराष्ट्र

  इतर लेख वाचा

  Leave a Reply