किराणा, भाजीपाला व पेट्रोल पंप होणार बंद ?- लॉकडाऊन होणार अधिक कडक ?

  0
  1555

  राज्यातील वाढत्या पादुर्भावामुळे 15 दिवसांचा लॉकडाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लावला आहे. मात्र आज पहिल्याच दिवशी लॉकडाऊन चे सर्व नियम वेशीवर टांगून लोकांनी लॉकडाऊनचा धज्जा उडवला.

  किराणा दुकान, भाजी मार्केट मध्ये गर्दी, लोकल ची गर्दी व अनावश्यक कारणासाठी बाहेर फिरणे हे आज पहिल्या दिवशी दिसून आले, या मुळेच लॉकडाऊन आहे की नाही हा प्रश्न निर्माण होतो. सरकारने फक्त अत्यावश्यक कारणासाठी ही सूट दिली होती मात्र लोक ह्याचा गैरफायदा घेत आहेत असे आज दिसून आले. आणि म्हणूनच लॉकडाऊन आता अधिक कडक करावा लागणार आहे असे संकेत राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.

  काय म्हणाले विजय वडेट्टीवार ?

  राज्यात लॉकडाऊन ची अंमलबजावणी होताना दिसत नाहीए असे आज पहिल्या दिवसातून दिसत आहेत म्हणूनच लॉकडाऊनचे निर्बंध अधिक कडक होतील व त्याबाबत मुख्यमंत्री स्वतः घोषणा करतील असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

  बरेचसे लोक विनाकारण रस्त्यावर येताना दिसत आहेत यांवर रोख आणण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेल दिले नाही पाहिजे फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांना पेट्रोल दिले पाहिजे असा निर्णय घ्यावा असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

  भाजीपाला, किराणा दुकानांची सूट रद्द होणार?

  आम्ही अजून एक दिवस जनतेला विनंती करतो अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही वडेट्टीवारांनी दिला आहे. त्याचबरोबर अत्यावश्यक सेवेतील भाजीपाला आणि किराणा यांना दिलेली सूट देखील रद्द करता येईल का? याबाबतही सरकार विचाराधीन असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिलीय.

  Advertisement
  कोरोना पासून वाचण्यासाठी करा हे घरगुती उपाय

  Leave a Reply