IPL 2021: टीममधून वगळल्यानंतर वॉर्नर ला अश्रू अनावर, फोटो पाहून फॅन्ससुद्धा हळहळले !

  0
  193
  Warner-Crying-SRH
  Warner-Crying-SRH

  2 मे रोजी झालेल्या राजस्थान विरुद्ध सामन्यात हा प्रसंग झाला, डगआउट मध्ये बसलेल्या वॉर्नर ला अश्रू झाले अनावर, अगदी फॅन्सला देखील अश्रू येईल असा हा फोटो.

  हैदराबादच्या मॅनेजमेंट ने यावर्षी झालेल्या खराब कामगिरी मुळे डेविड वॉर्नर कडून कप्तानी तर काढून घेतलीच मात्र राजस्थान विरुद्धच्या सामन्यात त्याला टीम मध्ये सुद्धा स्थान दिले नाही. वॉर्नर 2014 पासून सनराईसर हैदराबाद या फ्रांचैसी कडून खेळत आहे, दरवर्षी ऑरेंज कॅप म्हणजे सर्वाधिक धवांच्या यादीमध्ये त्याचा नंबर असतो मात्र यावर्षी कमजोर फॉर्म असल्याने कमी धावा काढल्या गेल्यात आणि यामुळेच त्याला संघामधून बाहेर बसण्याची वेळ आली आहे.

  त्यातच राजस्थान विरुद्धच्या मॅचच्या दरम्यान वॉर्नरचा व्हारल (Viral) झालेला एक फोटो पाहून क्रिकेट फॅन्स चांगलेच हळहळले आहेत.

  2 मे रोजी झालेल्या राजस्थान विरुद्ध सामन्यात वॉर्नर बाऊंडरी लाईनच्या बाहेर बसून मान खाली घालून रडत असताना हा फोटो काढलेला आहे, या फोटोने लाखो चाहत्यांचे मन दुखावले आहे तसेच चाहत्यांनी हैदराबाद ला चांगलेच सुनावले आहे, खाली काही चाहत्यांचे ट्विट दिले आहेत ते पहा आणि तुमच्या देखील भावना कमेंट बॉक्समध्ये कळवा.

  हैदराबादच्या टीमने अपयशाचे खापर वॉर्नर च्या डोक्यावर फोडले आणि त्याला टीममधून बाहेर केले मात्र, तरीही परिणाम तोच राहिला, केन विलीयम्सन ला कप्तानी देऊन सुद्धा तोच परिणाम दिसुन आला, राजस्थानविरुद्धच्या सामन्यात हैदराबादचा (SRH vs RR) 55 धवांनी पराभव झाला. राजस्थानने दिलेलं 221 रनचं आव्हान पार करण्यासाठी आलेल्या हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 165 रन करता आले. हैदराबादच्या एकाही बॅट्समनला अर्धशतकही करता आलं नाही. मनिष पांडेने (Manish Pandey) सर्वाधिक 31 रन केले.

  Leave a Reply