लॉकडाऊन मध्ये कोरोना पासून वाचण्यासाठी करा हे घरगुती उपाय

  0
  616
  covid home remedies
  covid home remedies

  सध्या महाराष्ट्रातील हॉस्पिटलमध्ये बेड्स ची कमी, रेमेडिसविर सारख्या महत्वाच्या औषधांची कमी, ऑक्सिजन ची कमी अशी परिस्थिती असताना कोरोना होने म्हणजे जणू यमदेवाला निमंत्रण, म्हणून स्वताची काळजी घेणे हा एकच पर्याय आपल्याला दिसत आहे. ह्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत कोरोना पासून वाचण्याचे घरगुती उपाय.

  १.आल्याचा काढा

  बनवायला सोप्पा असलेला हा काढा शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतो. आल्या मध्ये असलेले अँटिबायोटिक व जंतुनाशक गुणधर्म आल्याला कोरोनामध्ये अधिक महत्वपूर्ण बनवतात.

  आल्याचा काढा कसा बनवायचा ?

  सर्वप्रथम स्वच्छ धुतलेले व ताजे एक इंचभर आले घ्या व त्याला सोलून काढा.

  आता एका टोपात 2 ग्लास पाणी घ्या आणि त्यात वरील आले घालून उकळून घ्या.

  पाणी अर्धा होईपर्यंत उकळून घ्या व उरलेले पाणी काढा म्हणून प्या.

  Advertisement

  फायदे:

  1. रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
  2. विषाणूची लागण सहजरित्या होत नाही.
  3. ह्रदय विकारांसाठी देखील मददगार.

  २. मध व काळी मिरी

  मध आणि काळी मिरी चे मिश्रण आयुर्वेदा मध्ये सांगण्यात आले आहे, खोकला किंवा कफ ह्यावर रामबाण उपाय म्हणून ह्याचा वापर केला जातो.

  जर तुम्हाला कफ झाला असेल किंवा घशामध्ये खवखव जाणवत असेल तर एक चमचा मध घ्या व त्यात चिमूटभर काळी मिरीची पावडर घाला. असे दिवसातून दोन ते तीन वेळा केल्याने चांगलाच आराम मिळतो.

  ३.मसाले

  आपल्या सर्वांना माहित आहे की भारतीय मसाल्यांमध्ये औषधी गुणधर्म असतात.  म्हणूनच, आपल्या जेवणात दालचिनी, मिरपूड, वेलची, दगडफुल आणि लवंगा सारखे मसाले घाला.  वाळलेल्या हळद आणि वाळलेल्या आल्याचा देखील समावेश करा.

  ४.गरम पाण्याची वाफ

  श्वसन मार्गाची काळजी घेण्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे गरम पाण्याची वाफ, यामुळे तुमच्या श्वसन नलिकेत जिवाणू मरुन जातात किंवा निष्क्रिय होतात.

  पाण्यामध्ये तुलसी पत्र किंवा विक्स वेपोरब किंवा मेडिकल मधून वाफेच्या गोळ्या आना आणि त्या गरम पाण्यात घालून त्याची वाफ घ्या.

  Advertisement
  Advertisement

  आयुर्वेदा मध्ये सांगितलेले Antiviral औषधी वनस्पती

  १.तुळस

  तुळशी ला रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी दर्शविले गेले आहे, तसेच तुळस व्हायरल इन्फेक्शन विरूद्ध  देखील लढायला मदत करू शकते.

  २.लसूण

  लसूण ही व्हायरल इन्फेक्शन्ससह संसर्गजन्य रोगांसाठी एक लोकप्रिय नैसर्गिक उपाय आहे.

  ३.पेपरमिंट

  पेपरमिंटमध्ये शक्तिशाली अँटीव्हायरल गुण असल्याचे मानले जाते आणि सामान्यत: व्हायरल इन्फेक्शन्सवर उपचार करण्यासाठी ते चहा, काढा आणि आयुर्वेदिक टिंचरमध्ये वापरले जातात.

  ४.ज्येष्ठमध

  पारंपारिक अयुर्वेदीक औषध आणि इतर नैसर्गिक पद्धतींमध्ये शतकानुशतके जेष्ठमधचा वापर केला जात आहे.

  ५.जिनसेंग

  पारंपारिक चिनी औषधांमध्ये बराच काळ जिनसेंग चा वापर केला जात असे, हे व्हायरसशी लढण्यासाठी विशेषतः प्रभावी असल्याचे दर्शविले गेले आहे.

  Advertisement

  निष्कर्ष:

  रोनवर मात करण्यासाठी औषध मात्र अजून आलेले नाही परंतु लसीकरण हा एक पर्याय चांगला आहे, पण लस सुद्धा १०० % यशस्वी नाही आहे. म्हणूनच घरगूती उपाय अत्यंत लाभदायी ठरतील. कारण स्वताची काळजी घेणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे.

  हा लेख वाचा : महत्वपूर्ण बातमी : कोरोनाची लक्षणे सहसा या क्रमाने दिसली जातात !
  हा लेख वाचा : राज्यात संपूर्ण लॉकडाऊन वाचा काय राहील चालू व कोणाला किती मदत मिळणार ?
  हा लेख वाचा : दाढ दुखीवर सोपा घरगुती उपाय – Simple Home Remedy for Toothache
  हा लेख वाचा : पित्तापासून मिळवा त्वरित आराम, करा हे उपाय

  राज्यात संपूर्ण लॉकडाऊन वाचा काय राहील चालू व कोणाला किती मदत मिळणार ?
  महाराष्ट्र: १३ एप्रिल रात्री ८:३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली राज्यात संपूर्ण …
  महत्वपूर्ण बातमी : कोरोनाची लक्षणे सहसा या क्रमाने दिसली जातात !
  कोरोनाची प्रमुख लक्षणे ताप आणि खोकला आहेत जे इतर रोगांच्या लक्षणांप्रमाणेच असतात …

  Leave a Reply