यंदाच्या IPL मधला सर्वात लांब षटकार पोलार्डने मारला व्हिडीओ पाहिलात का ?

  0
  572

  केरोन पोलार्ड आपल्या ताबडतोब फलंदाजी साठी ओळखला जाणारा खेळाडू आहे. माईटी वेस्ट इंडियन केरोन पोलार्ड 2010 पासून मुंबई इंडियन्स चा खेळाडू आहे. त्याचप्रमाणे त्याने फलंदाजी देखील मुंबई इंडियन्स साठी केली आहे.


  शनिवारी झालेल्या सनराईसर हैद्राबाद सोबत झालेल्या मॅचमध्ये चिदंबरम स्टेडियम मध्ये यंदाच्या हंगामातील सर्वात लांब षटकार मारला आहे. 105 मीटर लांबीचा हा गगनभेदी व लांबलचक षटकार पोलार्ड भाऊंनी खेचलाय या आधी ग्लेन मॅक्सवेल ने 100 मीटर चा रेकॉर्ड केला होता.

  मुजीब-उर-रेहमान च्या गोलंदाजी वर केरोन पोलार्ड ने हा षटकार मारला आहे.

  व्हिडीओ:-

  Advertisement

  यंदाच्या IPL मधले लांब षटकार : पोलार्ड 105 मीटर, मॅक्सवेल 100 मीटर, सूर्य कुमार यादव 99 मीटर, मनिश पांडे 96 मीटर, अब्दुल समाद 93 मीटर.

  या मॅचमध्ये सनराईसर हैद्राबाद ने मुंबई इंडियन्सला २० षटकांत पाच बाद १५० धावांवर रोखले होते. सनराईसर हैद्राबाद ची सुरुवात चांगली होती मात्र नंतर मुंबई इंडियन्स च्या गोलंदाजाने कमबॅक करत मॅच पुन्हा आपल्या पारड्यात आणली.

  Leave a Reply