पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, त्यांनी फेकाफेकीचं राजकारण केलं : नवाब मलिक

  0
  121

  देशात कोरोनामुळे अत्यंत भयानक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, या परिस्थितीला केंद्रीय सरकार जबाबदार असल्याने पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली होती मात्र यावर उत्तर देत अमित शाह यांनी असे सांगीतले होते की जेव्हा जनता आम्हाला नाकारेल तेव्हा आम्ही राजीनामा देऊ. याच विधानाचा संदर्भ घेऊन महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आशी मागणी केली आहे की पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना जनतेने नाकारले असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा.

  पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी बंगालच्या निवडणुकीच्या निकालावर उत्तर द्यावं असही नवाब मलिक बोलत होते.

  भाजपचे जेष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये गेल्या तीन वर्षांपासून एक माहोल बनविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अबकी बार 200 पार असे बोलून फेकाफेकीचे राजकारण केलं. आता निवडणुकीच्या निकालाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, असं नवाब मलिक म्हणाले (Nawab Malik Slams Amit Shah and Narendra Modi).

  इतर लेख

  Leave a Reply