कोरोना होम ट्रीटमेंट, रेमेडिसविर चे पर्यायी औषध आणि ऑक्सिजन चे व्यवस्थापन

  0
  403
  covid home treatment
  covid home treatment

  नमस्कार मित्रांनो, सध्या संपूर्ण राज्यात व देशात बेड नाहीत, ऑक्सिजन ची कमतरता आहे, रेमेडिसविर सारखी औषधे नाहीत मग अशा वेळेस करायचं काय आपल्या नातेवाईकांना मरायला सोडायचे की वाचवायचे? ह्याच मुद्द्यावर आधारित हा लेख कोरोना बद्दल सम्पूर्ण माहिती देणारा लेख आहे. यामध्ये आपण पाहणार आहोत कोरोनाची होम ट्रीटमेंट कशी घ्यायची, रेमेडिसविर ला पर्यायी औषध काय आहेत व ऑक्सिजन चे व्यवस्थापन कशे करायचे.

  मात्र एक सूचना आहे खाली दिलेला उपाय फक्त बेड किंवा कोरोनाची साधारण सुविधा तुम्हाला उपलब्ध नसेल होत तरच करावा.

  सर्वप्रथम तुम्हाला सांगतो व्हाट्सऍप वर येणारे घरगुती उपाय कोरोना रुग्णावर करू नका फक्त आणि फक्त साइंटिफिकली सिद्ध असलेले उपचार तुम्ही करा.

  जर तुमच्या घरी कोणी कोरोना बाधित रुग्ण असेल तर सर्वप्रथम तुम्ही त्यांना एक स्वतंत्र खोलीमध्ये ठेवावे, या खोलीत सौचालयाची सोय असल्यास अधिक चांगले, कोरोना बाधित रुग्णांना स्वतंत्र सौचालय असणे गरजेचे आहे.

  यानंतर तुम्हाला कोरोना बाधित रुग्णांना मॉनिटर किंवा त्यांच्या तब्बेतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही यंत्रणा लागतील अगदी 1000 ते 2000 रुपयांमध्ये ह्या यंत्रणा येतील या मध्ये शामिल आहे:

  Advertisement
  1. ऑक्सिमीटर
  2. थरमामीटर
  3. सॅनिटायजर
  4. काळ्या प्लास्टिकच्या पिशव्या
  5. मास्क
  6. ग्लोव्स

  ऑक्सिमीटर व थरमामीटर हे दोन मुख्य मोनिटरिंग डिव्हाईस आहेत जे तुम्हाला अत्यावश्यक आहेत कोरोना रुग्णांवर निगराणी राखायला.

  कोरोना रुग्णाची निगराणी करण्यासाठी एक सोप्पा तक्ता बनवा आणि प्रत्येक 6 तासाला कोरोना रुग्णाची तपासणी करा.

  तक्त्याचे उदाहरण

  ऑक्सिजन (Oxygen Saturation)
  शरीराचे तापमान (Body Temperature)
  नाडी (Pulse)
  कोविड रुग्णांचा तक्ता

  शरीरातील ऑक्सिजन दोन प्रकारे तपासा, कसे तपासाल ?

  पहिल्यांदा खुर्चीवर आरामात बसून ऑक्सिजन ची मात्रा तपासा आणि दुसऱ्यांदा 2 मिनटं हलका व्यायाम करून शरीरातील ऑक्सिजन ची मात्रा वरील तक्त्यात लिहून काढा.

  जर ऑक्सिजन ची पातळी/मात्रा 94% पेक्षा अधिक असल्यास   तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याची काहीही आवश्यकता नसते तुम्ही घरूनच कोरोनाची ट्रीटमेंट घेऊ शकता.

  जर ऑक्सिजन ची पातळी/मात्रा 92% ते 94% मध्ये असेल तर प्रत्येक 4 तासाला ऑक्सिजन ची मात्रा चेक करत रहा व जास्तीत जास्त आराम करा, या वेळेस पालथे झोपत जा कारण पालथे झोपल्याने ऑक्सिजन ची मात्रा अधिक वाढते.

  Advertisement
  Advertisement


  दुसऱ्या बाजूला तुम्हाला कोरोना रुग्णाच्या शरीराचे तापमान देखील नियंत्रणात ठेवायचे आहे, दर 6 तासाला शरीराचे तापमान मोजत रहा. जर रुग्णाला ताप येत असेल तर 1 ग्राम पेरासीटमोल ची गोली दर 6 ते 8 तासांनी तुम्ही देऊ शकता.

  कोरोनाच्या संसर्गात रुग्णांना हायड्रेट राहणे गरजेचे असते म्हणून कोरोना काळात रुग्णाला अधिकाधीक पाणी देणे गरजेचे आहे. यासोबतच कोरोना रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो म्हणून श्वसण मार्गाने देणारे स्टेरॉईड चे औषध द्यावे लागते जशे की बुडेसामाईड 0.5/2ml चे औषध दिवसातून दोन वेळा वापरायचे असते.

  जर ऑक्सिजन ची पातळी 92% पेक्षा कमी असेल तर रुग्णाला बेड उपलब्ध असल्यास हॉस्पिटलमध्ये दाखल करावे, अशा परिस्थितीत दिली जाणारी औषधे आहेत:

  • Dexamethason 6mg/day किंवा यासारखे दुसरे औषध
  • Prednisone 40mg
  • MethylPrednisolone 30mg
  • hydrocortisone 150mg

  वरील दिलेल्या औषधांपैकी कुठलेही एक औषध तुम्ही घेऊ शकता, शरीरातील ऑक्सिजन ची पातळी वाढविण्यासाठी.यासोबतच रात्री झोपताना पोटावर झोपणे आवश्यक आहे असे झोपल्याने शरीरातील ऑक्सिजन वाढते हे साइंटिफिकली सिद्ध झाले आहे.

  वरील माहिती थोडक्यात

  1. ताप असेल तर पेरासीटमोल घ्या
  2. अधिकाधिक पाणी पिणे
  3. रुग्णांच्या पायांची हालचाल करा

  पाय पकडा व वर्तुळाकार फिरवा याने रुग्णांच्या पायांची हालचाल होईल. यासोबतच तुम्हाला ऑक्सिजन ची आवश्यकता देखील भासू शकते म्हणून तुम्ही ऑक्सिजन सिलेंडर ची सोय करायला घ्या, ऑक्सिजन लावण्यासाठी नेसल कॅनूला चा वापर करा, हे सोप्पे व सोईस्कर माध्यम आहे ऑक्सिजन लावण्यासाठी.

  Advertisement

  2 ते 4 Ltr  च्या प्रेशर ने ऑक्सिजन सिलेंडर ची सुरुवात करा आणि जास्तीस जास्त तुम्ही 6 Ltr पर्यंत जाऊ शकता, 2 पासून  सुरुवात करा आणि शरीरातील ऑक्सिजन ची पातळी 92% च्या वर राहील आशा प्रेशर ने ऑक्सिजन चा प्रवाह ठेवा.

  जर वरील ऑक्सिजन सिलेंडर ने देखील रुग्णाच्या शरीरातील पातळी 90% पेक्षा खाली असेल तर काय करावे?

  1. हॉस्पिटलमध्ये बेड मिळवणे गरजेचे आहे बेड न भेटल्यास वरील ट्रीटमेंट घरीच चालू ठेवावी.
  2. वरील औषधे आहेत त्याच मात्रेत चालू ठेवावीत.
  3. ऑक्सिजन चा प्रेशर 6 Ltr वरून 10 Ltr करू शकता.
  4. रुग्णाला पोटावर झोपवण्यात यावे.

  खालील दिलेल्या औषधांचा वापर जास्त प्रमाणात करू नका कारण एका वेळेस ही औषधे गरजेपेक्षा जास्त वापरली जात होती.

  • Azithromycin
  • Favipavirivermectin
  • Remdesvir
  • Doxycycline
  • Hydroxychloroquine

  रेमेडिसविर बद्दल माहीती

  1. रेमेडिसविर बद्दल अजून पर्यंत कोणतेही असे रिपोर्ट किंवा रिसर्च नाही आहेत जे खात्रीपूर्वक सांगू शकतात की रेमेडिसविर कोरोना रुग्णांचा जीव वाचवू शकतो म्हणून.
  2. मात्र काही रिपोर्ट मध्ये असे सांगण्यात आले आहे की रेमेडिसविर ला जर बरोबर वेळी घेतले तर रोगाचा कालावधी कमी होऊ शकतो.
  3. रेमेडिसविर काम करेलच असं कुठल्याही रिसर्च मध्ये अद्यापही सांगण्यात आलेलं नाही आहे, ह्या औषधांची उगाचच एक हवा निर्माण झाली आहे त्यामुळे रेमेडिसविर चा तुटवडा पडताना दिसत आहे.

  सूचना:

  वरील दिलेली माहिती सध्याच्या वापरात असलेली औषधी प्रणाली आहे हीचा वापर फक्त आणि फक्त डॉक्टरांच्या निगराणी खाली करा असा सल्ला आम्ही देतो.

  Leave a Reply