63 – वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीची वेळेत नाश्ता न दिल्यामुळे केली हत्या.
कोल्लम: केरळ मधील कोल्लम इथे एक आगळे वेगळे हत्या प्रकरण समोर आलें आहे. 63 वर्षाच्या नवऱ्याने बायकोची हत्या केवळ ह्या कारणापायी केली की तिने वेळेत नाष्टा बनवला न्हवता.
भाड्यावर जमीन घेऊन शेती करणाऱ्या सोमदास ने आपल्या 53 वर्षीय बायकोचा खून केल्याबद्दल अटक झाली आहे.खरतर पोलिसांना देखील हत्त्येच कारण ऐकून धक्का बसला आहे.
मूळचे तिरुवनन्तपुरम चे असलेले हे दाम्पत्य काही वर्षांपासून मवाड इथे राहायला आले होते.पोलिसांच्या म्हणण्यानुसार सोमदास शेतातून काम करून घरी आला व त्याने बायको जवळ नाष्टा मागितला मात्र वेळेत नाष्टा न दिल्याने त्यांचे भांडण चालू झाले व त्यामध्ये सोमनाथ ने बायकोवर हमला केला व तिचा जीव गेला.
1 Comment